Breaking News

मुधोजी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरा

 ध्वजारोहण करताना उपाध्यक्ष मे.गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण चे  मा.श्री अशोक जिवराज दोशी व इतर मान्यवर
75th Independence Day was celebrated with enthusiasm in Mudhoji High School with various programs

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध स्पर्धा व कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण उपाध्यक्ष मे.गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण अशोक जिवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    ध्वजारोहण कार्यक्रमाला  श्री. रमणलाल आंनदलाल दोशी व्हा. चेअरमन मे.गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी , फलटण,  शिरिष शरदकुमार दोशी सदस्य  मुधोजी हायस्कूल  स्कूल कमिटी फलटण,  हेमंत वसंतराव रानडे सदस्य  मुधोजी हायस्कूल. स्कूल कमिटी , फलटण , श्री डॉ. पार्श्वनाथ पुरुषोत्तम राजवैध सदस्य मुधोजी हायस्कूल स्कूल कामिटी , फलटण ,श्री. शिवाजीराव बाबुराव घोरपडे सदस्य मुधोजी हायस्कूल, स्कूल कमिटी , फलटण,  श्री अरविंद सरखाराम निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण,  श्री श्रीकांत बाबूराव फडतरे अधिक्षक फलटण एज्यूकेशन सोसायटी, फलटण , श्री राजगुडा सर तपासणीस ,  अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण , श्री गंगवणे बाबासाहेब प्राचार्य , मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण ,  श्री ननावरे ए. वाय. उपप्राचार्य  मुधोजी हायस्कूल , फलटण ,  श्री फडतरे सर उपप्राचार्य  मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण , श्री शिवाजीराव काळे पर्यवेक्षक मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण , शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी  पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    यावेळी मुधोजी हायस्कूल च्या इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थांनी अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले . यामध्ये चित्रकला , रांगोळी व मेहंदी याचे भव्य दालन खोली क्र. ५ ते ८  मध्ये उभारण्यात आले होती . याचे उद्घाटन  उपाध्यक्ष मे.गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण  श्री अशोक जिवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते. या कलादालनासाठी कला शिक्षक बापूराव सुर्यवंशी व त्यांचे सहकारी चेतन बोबडे , गोफणे सर ,हुंबे सर , सौ. एस सस्ते मॅडम , सौ. आगवणे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले . कलादालनाचे उद्घाटन झाल्यानंतर नंतर ते विद्यार्थी , पालक व नागरिक यांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. हे कलादालन पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच यावेळ राष्ट्रीय कॅडेट कोर (एन सी सी ) च्या विद्यार्थांनी शपथ घेतली , संचलन ही केले . यांना मागदर्शन श्री पवार यांनी केले.

     तसेच यावेळी  प्राचार्य गंगवणे सर यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी फलटण  श्री. शिवाजीराव जगताप, तहसीलदार फलटण  श्री. समीर यादव यांनी या कलादालनास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवलेल्या विविध कार्यक्रमाचे व स्पर्धांचे विशेष कौतुक केले.

    तसेच यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होती. या स्पर्धेचे उद्घाटन फलटण नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर व काशिद सर यांनी केले यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री गंगवणे बाबासाहेब , उपप्राचार्य श्री ए वय ननावरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे  व मार्गदर्शक शिक्षक श्री जगताप , श्री परहर , श्री शिंदे , श्री अभंग  व विद्यार्थी उपस्थित होते.

    तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांच्या संघांना निमंत्रित करून  सिक्स साईड हॉकी स्पर्धा व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे यावेळी करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मे. गव्हर्निंग कौन्सिल च्या क्रीडा समिती चे अध्यक्ष  श्री शिवाजीराव घोरपडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी  आंतरराष्ट्रीय  हॉकी खेळाडू कु.अक्षता ढेकळे हिला या स्पर्धा उद्घाटनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री गंगवणे बाबासाहेब, उपप्राचार्य मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री फडतरे सर , उपप्राचार्य मुधोजी हायस्कूल श्री ननावरे ए . वाय. , फुटबॉल सीनियर कोच संजय फडतरे, क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ , क्रीडा शिक्षक श्री. बी. बी. खुरंगे , अमोल नाळे , सुरज ढेंबरे, धनश्री क्षीरसागर , अमित काळे , पद्मसिंह निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजीत जमदाडे, आर. बोबडे , बी खुरंगे यांनी केले.

No comments