'आपली - फलटण मॅरेथोन २०२२' मध्ये लोकाग्रहास्तव १८ ते ३० वर्षे वयोगटाचा समावेश ; सर्व गटांसाठी रोख बक्षीसे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर , फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, या स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, खास लोकाग्रहास्तव या मॅरेथॉन स्पर्धेत १८ ते २५ वयोगटातील स्पर्धकांना संधी देऊन, १८ ते ३० वर्षे वयोगटाचा नवीन समावेश केला आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला मेडल व ई सर्टिफिकेट दिले जाईल. प्रत्येक गटात पुरुष व महिला प्रत्येकी पहिल्या येणाऱ्या तिघांना बक्षीस दिले जाणार असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी कळविले आहे.
नवीन बदलानुसार आता आपली -फलटण मॅरेथॉन मध्ये १) १८ ते ३० (पुरुष व महिला) जोश पूर्ण युवा गट २) ३२ ते ४५ (पुरुष व महिला) सळसळती तरुणाई ३) ४६ ते ६४ (पुरुष व महिला) प्रगल्भ प्रौढ ४) ६५ च्या पुढे (पुरुष व महिला) अनुभवी ज्येष्ठ असे एकूण ४ गट करण्यात आले आहेत. पहिले तीन गट हे ५ किंवा कि.मी. च्या मॅरेथॉन मध्ये आपल्या क्षमते नुसार भाग घेऊ शकतात. चौथा गट हा फक्त ३ कि. मी. वॉकेथॉन साठीच आहे, चौथ्या गटाला ३०० रु. रजिस्ट्रेशन फी माफ आहे.
दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन फलटण येथून १० कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. सकाळी ६. ३० वाजता सजाई गार्डन येथून ५ कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी ७ वाजता ३ कि. मी. वॉकेथॉन (जलद चालणे) स्पर्धा सुरू होणार आहे.
सकाळी ९ वाजता सजाई गार्डन कार्यालयामध्ये सर्वांचे स्वागत व अल्पोपहार, सकाळी १०.३० वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरु होणार असून दुपारी १ वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सजाई गार्डन कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.
मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. २५ सप्टेंबर पर्यंत आनलाईन नोंदणी joshihospitalpvtltd.com या वेब साईट वर करता येणार आहे . प्रवेश शुल्क ३००/- फक्त आहे. ज्येष्ठ नागरिक यांना कोणतीही फी आकारली जाणार नाही. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रत्येकाला मेडल व ई सर्टिफिकेट दिले जाईल. प्रत्येक गटात पुरुष / महिला प्रत्येकी पहिल्या येणाऱ्या तिघांना बक्षीस दिले जाणार असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
दि. ९,१० आणि ११ ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत रु. ३००/- भरून मॅरेथॉनचे किट घेऊन जावे, यामध्ये टीशर्ट, रनर बिब, टोपी आणि एक आकर्षक गिफ्टचा समावेश आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण तर्फे करण्यात आले आहे .
No comments