फलटण येथून २ अल्पवयीन मुलांचे अपहरण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मलठण, फलटण येथून दोन अल्पवयीन मुलांना अज्ञात कारणासाठी कोणीतरी पळवून नेल्याची फिर्याद मुलाच्या आईने फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार अज्ञात विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मलठण, फलटण गावचे हद्दीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने, आरती जाधव यांचा अल्पवयीन मुलगा ओमकार अरुण जाधव वय १४ वर्षे व पुतण्या अर्जुन राजेंद्र जाधव वय १५ वर्षे यांना अज्ञात कारणासाठी पळवुन नेले असल्याची फिर्याद आरती अरुण जाधव रा. महतपुरा पेठ, मलठण, फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.
No comments