शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे ५.५८ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सकाळी त्यांना पनवेल स्थित एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
No comments