जीवनामध्ये शिक्षणाबरोबर खेळालाही मोठे महत्व - समीर यादव ; जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी स्पर्धा फलटण येथे संपन्न
स्पर्धेचा शुभारंभ करताना समिर यादव त्यावेळी शिवाजीराव घोरपडे, महेश खुटाळे, किरण बोळे, ॲड. रोहित आहिवळे व अन्य |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ : शालेय जिवनामध्ये शिक्षणाबरोबर खेळाला ही मोठे महत्व आहे. खेळामुळे व स्पर्धांमुळे जीद्द, मेहनत, चिकाटी, सराव हे गुण वाढीस लागतात व त्यातुनच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडते असे प्रतिपादन तहसिलदार समिर यादव यांनी केले.
क्रीडा व युवकसेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेवतीने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, फलटण, मुधोजी हायस्कूल व जिल्हा हॉकी प्रशिक्षण केंद्र द्वारा फलटण येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी स्पर्धेचा शुभारंभ तहसिलदार समिर यादव यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य शिवाजीराव घोरपडे, पत्रकार ॲड. रोहित अहिवळे, किरण बोळे, तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, प्रशिक्षक सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षक बंडू खुरंगे, धनश्री क्षिरसागर, माजी राष्ट्रीय खेळाडू सुजित निंबाळकर, सचिन लाळगे आदींची उपस्थिती होती.
मुधोजी हायस्कूल, फलटण विरुद्ध सैनिक स्कूल, सातारा सामन्यातील एक क्षण |
No comments