बहिणीशी लग्न केले नाही म्हणून मारहाण ; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : चुलत बहिणीशी लग्न का केले नाही अशी विचारणा करुन एकास मारहाण केल्याची घटना गुणवरे ता. फलटण येथे घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गणेश बंडू चव्हाण, भैय्या बंडू चव्हाण, राहुल दत्तात्रय जाधव, कांता दत्तात्रय जाधव सर्व रा. गुणवरे ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश सुखदेव जाधव वय ४२ रा. गुणवरे ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि. २९ अॉगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गुणवरे गावच्या हद्दीतील गुणवरे ते घुले वस्ती जाणारे रोडवरील पुलावर आपण भेळ खात बसलो होतो, तेव्हा गणेश बंडू चव्हाण, भैय्या बंडू चव्हाण, राहुल दत्तात्रय जाधव, कांता दत्तात्रय जाधव हे पायी चालत आले, त्यापैकी भैय्या बंडू चव्हाण याने आपणास माझ्या चुलत बहीणीशी लग्न का केले नाही असे विचारले तर राहुल दत्तात्रय जाधव याने आपणास गजाने मारहाण केली. तर गणेश बंडू चव्हाण,भैय्या बंडू चव्हाण, कांता दत्तात्रय जाधव यांनी धरून जमिनीवर आपटले व चौघांनी मिळून आपणास शिवीगाळ दमदाटी करुन दोन मोबाईल हँडसेट फोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले. अधिक तपास पोलिस हवालदार साबळे करीत आहेत.
No comments