'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन
दलाल स्ट्रीटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. अवघ्या 5 हजार रुपयांपासून सुमारे 43.39 कोटींचा पल्ला गाठणारे झुनझुनवाला 62 वर्षांचे होते. त्यांनी गत आठवड्यातच 'अकासा' एअरलाइंसच्या माध्यमातून एव्हिएशन सेक्टरमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर लगेचच ही धक्कादायक बातमी आली आहे. झुनझुनवाला यांनी 1992 च्या हर्षद मेहता घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून मोठा नफा मिळवला होता.
राकेश झुनझुनवाला प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांना रविवारी सकाळी 6.45 च्या सुमारास मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणूनही ओळखले जात होते. त्यांना भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जात होते. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. अकासा एअरलाइंसमध्ये राकेश व त्यांच्या पत्नी रेखा यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
No comments