साखरवाडी येथे जुगार खेळणाऱ्या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत, मारुती मंदिरा जवळील झाडा खाली, काहीजण जुगार खेळत होते. याठिकाणी फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून, जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम जप्त केले व जुगार खेळणाऱ्या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत, मारुती मंदिरा जवळील झाडा खाली, काहीजण जुगार खेळत असल्याचे फलटण ग्रामीण पोलिसांना समजले असता, महिला पोलिस उपनिरिक्षक एस. ए. धोंगडे, पो हवालदार हांगे, पो. शी. निखिल आत्माराम गायकवाड यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. या ठिकाणी जुगाराचे साहित्य, ४ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व सिद्धार्थ प्रेमचंद लोंढे वय ६० वर्षे रा. पिंपळवाडी ता. फलटण २) बाळू आप्पा गायकवाड वय ५४ वर्षे ३) रमाकांत बबन गायकवाड वय ३२ वर्षे ४) यशवंत पोपट बनसोडे वय ४५ वर्षे ५) अशोक कोंडीबा भोईटे वय ६६ वर्षे सर्व राहणार साखरवाडी ता. फलटण यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार हांगे हे करीत आहेत.
No comments