आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल ; तलवारीसह आसू येथील युवकास अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली तलवार सापडल्या प्रकरणी आसू ता. फलटण येथील विकास दौलत पवार या युवकाच्या विरोधात शस्त्र अधिनियम १९५९ (आर्म्स ॲक्ट) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फलटण ग्रामीण पोलिसांनी विकास पवार यांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास विकास दौलत पवार वय २६ वर्ष रा.आसू ता. फलटण यांनी ८० सेंमी लांब असणारी लोखंडी तलवार त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली त्याच्या कब्जात मिळून आली. पोलिसांनी सदर हत्याराबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची व असबंध माहिती सांगितली. त्यामुळे पवार यांच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ (आर्म्स ॲक्ट) कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी विकास पवार यांना अटक केली आहे. अधिक तपास सहा. पोलीस फौजदार सूर्यवंशी हे करीत आहेत.
No comments