सह्याद्रीभैय्या युवा मंचाची दहीहंडी उत्साहात साजरी
दहीहंडी शुभारंभ प्रसंगी सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब), रिल्स स्टार गायित्री कोरपे, सुरज कदम - पाटील अमीरभाई शेख, अमोल सस्ते, मेहबुबभाई मेटकरी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे सह्याद्रीभैय्या युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पै. सुरज कदम (पाटील ) यांनी केले होते. दहीहंडी गोखळी संघाने फोडली. दहीहंडीस युवावर्गाने गर्दी केली होती.
दहीहंडीचा शुभारंभ सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब) यांच्या हस्ते व रिल्स स्टार गायित्री कोरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे, सुरेश पवार, जाकीरभाई मणेर, उद्योजक सागर शहा, अमितशेठ भोईटे, फलटण तालुका कुस्ती संघ अध्यक्ष शंभु बोबडे, मेहबुबभाई मेटकरी, कॉग्रेस कार्याध्यक्ष अमरभाई शेख, फलटण कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे, भाजपा शहर अध्यक्ष अमोल सस्ते, पांडुरंग अहिवळे, अभिलाष काकडे, अमोल भोईटे, राहुल पवार, शिवसेना शहर अध्यक्ष निखिल पवार, शेखर पवार, पत्रकार रोहित अहिवळे, युवराज पवार, अशोक उर्फ शक्ती भोसले तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments