मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे - जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक ; स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांचा होणार सन्मान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या वतीने मेडल देऊन, सन्मानित करण्यात येणार आहे, तरी खेळाडूंनी मोठ्या संख्येने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी, सातारा येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६ वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ८ ते १२ वर्षे मुले/मुली (२ कि.मी.), १८ वर्षे मुले/मुली ५/३ कि.मी., पुरुष (१० कि.मी.) व महिला (५ कि. मी.) या वयोगटामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/swatantra-amrit-mahotsava-mini-marathon-2022-244213 या लिंकवर दि. १० ऑगस्ट २०२२ पर्यंत नांव नोंदणी करावी. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असून, स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना मेडल तसेच टी-शर्ट देण्यात येणार आहे.
No comments