Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने 'घरोघरी संविधान' उपक्रम

उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात महिला वर्गास संविधानाचे वाटप करण्यात आले
Door-to-door constitution activities on behalf of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Mahotsav Committee

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने 'घरोघरी संविधान' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची प्रशंसा करत उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

    फलटण येथे “घरोघरी संविधान” या उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या शुभहस्ते व  तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. याप्रसंगी  मा. नगरसेवक सचिन अहिवळे, मा.नगरसेवक सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, दत्ता अहिवळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विजय येवले,  कामगार संघटनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे, ॲड.रोहित अहिवळे, जे.एस.काकडे, शांतीलाल सोरटे, यशवंत काकडे, बाळासाहेब अहिवळे, हर्षल लोंढे तसेच सर्व जेष्ठ मान्यवर, युवा मित्र परिवार व जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांच्यासह जंयती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे स्वागत करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी 

    घरोघरी संविधान उपक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात महिला वर्गास संविधानाचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच यश संपादन केलेल्या युवा वर्गास व चळवळीतील कार्यकर्त्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

    याप्रसंगी जे.एस. काकडे, दत्ता अहिवळे, सचिन अहिवळे, शामराव अहिवळे, सनी काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    यावेळी शामराव अहिवळे, सागर सोरटे, जयकुमार रणदिवे, हरीष काकडे, संजय गायकवाड,  मंगेश आवळे, महादेव काकडे,   सुशांत अहिवळे, कुणाल काकडे, प्रतीक गायकवाड, गौतम अहिवळे, सुशांत काकडे, केतन सोरटे, विकी काकडे, निखिल अहिवळे, अंश काकडे, हर्षवर्धन अहिवळे आदी मान्यंवर उपस्थित होते.

No comments