ड्रंक अँड ड्राईव्ह ; फलटण तालुक्यातील दोघांवर गुन्हे दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ - सातारा रोडवर, वाठार निंबाळकर फाटा येथे, फलटण ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत, दोघांविरोधात मोटार वाहन कायदा अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास, सातारा रोडवर, वाठार निंबाळकर फाटा येथे, फलटण ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी, सचिन रामचंद्र कुदळे रा. कुदळे वस्ती, वाठार निंबाळकर ता. फलटण हे बोलत असताना, त्यांच्या तोंडाचा दारू सेवन केल्याचा वास आल्याने, पोलिसांनी त्यास ब्रिथ ॲनालायझर मध्ये वास देण्यास सांगितले असता, त्यांचा अल्कोहोल रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने व सदर मशीन मधून दारू पिल्यांची पॉझिटिव्ह प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास, त्याच ठिकाणी, विशाल शिवाजी चव्हाण रा. झिरपवाडी ता. फलटण हे, बोलत असताना, त्यांच्या तोंडाचा दारू सेवन केल्याचा वास आल्याने, पोलिसांनी त्यास ब्रिथ ॲनालायझर मध्ये वास देण्यास सांगितले असता, त्यांचाही अल्कोहोल रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने व सदर मशीन मधून दारू पिल्यांची पॉझिटिव्ह प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक धराडे हे करत आहेत.
No comments