फलटण येथे पतंग स्पर्धा संपन्न ; स्पर्धेचा आनंद घ्या, मात्र जीवघेण्या चायनीज मांज्याचा वापर करु नका : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कोणताही खेळ किंवा सण, उत्सव आनंद घेण्यासाठी असल्याने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पतंग स्पर्धा मधून आनंद घ्या, मौज मजा करा, पण कोणत्याही परिस्थितीत जीवघेण्या चायनीज मांज्याचा वापर अजिबात करु नका अशा स्पष्ट सूचना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ, फलटण आयोजित भव्य पतंग स्पर्धा उदघाटन आ.दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शनिमंदिर परिसरात, बाणगंगा नदी काठी समारंभपूर्वक संपन्न झाले, यावेळी ज्येष्ठ पतंगपटू रशिदभाई शेख, पतंगपटू जंगलराव कापसे यांच्यावतीने संजय कापसे व पतंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणारे पै.पप्पूभाई शेख यांचा यथोचित सत्कार श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
![]() |
सोहेल खान यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरण करुन अभिनंदन करताना जगन्नाथ तथा भाऊ कापसे मा.नगरसेवक किशोर पवार (गुड्डू),पै.पप्पूभाई शेख, अभिजीत जानकर व अन्य मान्यवर. |
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या यावर्षीच्या स्पर्धांमध्ये उत्साह अधिक आहे, मात्र चायनीज मांज्यामुळे काळज ता.फलटण येथील बालिकेवर ओढवलेला जीवघेणा प्रसंग लक्षात ठेवून कोणीही चायनीज मांजा न वापरता आनंदात या स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोंसले-पाटील, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, माजी नगरसेवक नंदकुमार घारगे, मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ कापसे, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य नितीन गांधी, पै.विजय गोफणे, तुषार नाईक निंबाळकर, अभिजीत जानकर, आबा बेंद्रे, निलेश खानविलकर, अनंत भोंसले-पाटील, प्रितसिंह खानविलकर, सुहास निंबाळकर, जगन्नाथ तथा भाऊ कापसे, जमशेद पठाण, आबीद खान, बापू देशमुख, दिपक देशमुख, सनी शिंदे, वजीरभाई आत्तार, कांताशेठ नाईक, अमोल काळे, राजेंद्र महामुनी, असिफ शेख, शाकिर महात, पप्पू मांढरे, गणेश कापसे, हर्षद निंबाळकर आणि फलटण शहरातील असंख्य पतंग प्रेमी उपस्थित होते.
स्पर्धा संपताच सायंकाळी ५:३० वाजता माजी नगरसेवक किशोर पवार (गुड्डू), भाऊ कापसे, पै.पप्पूभाई शेख, अभिजीत जानकर, अविनाश पवार, श्रीनाथ नलवडे, शाम अहिवळे, बाळासाहेब भट्टड यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ पूर्वक संपन्न झाले.
या स्पर्धेमध्ये सोहेल खान यांनी चषक व ४ हजार रुपये रोख हे प्रथम क्रमांकाचे, पै.पप्पू शेख मित्र मंडळ यांनी चषक व ३ हजार रुपये रोख हे द्वितीय क्रमांकाचे, चि.अर्जुन प्रभंजन कापसे याने चषक व २ हजार रुपये रोख हे तृतीय क्रमांकाचे, वसीम शेख याने १ हजार रुपये रोख हे चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेमध्ये ३२ स्पर्धक सहभागी झाले होते, पतंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ, पै.पप्पूभाई शेख मित्र मंडळ, पै.पप्पूभाई शेख, अविनाश पवार, फिरोज शेख, संजय कापसे, वसीम शेख यांनी परिश्रम घेतले.
No comments