Breaking News

पी.एम.किसान योजनेतील शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Farmers under PM Kisan scheme should complete e-KYC - Collector Ruchesh Jayavanshi

    सातारा दि. 24 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेती ज्या शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण करणे प्रलंबित आहेत अशा शेतकरी लाभार्थ्यांनी विना विलंब 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाकडून सुचित करण्यात आलेले आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी e-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंर्गत पात्र शेतकऱ्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण केल्याशिवाय ऑगस्ट 2022 नंतरच्या इतर व बाराव्या हप्त्याच्या पुढील हप्ता वितरीत होणार नाही, असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी शेतकरी लाभार्थ्यांनी विना विलंब 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण करुन घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले आहे.

No comments