पाच पांडव आश्रमशाळेत डॉ. सूर्यकांत दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
ध्वजारोहण करताना डाॅ.सुर्यकांत दोशी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अलगुडेवाडी ता. येथील पाच -पांडव आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिना निमीत्त जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डाॅ.सुर्यकांत दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे सचिव श्रीपाल जैन,फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व जैन सोशल ग्रुपचे झोन कमीटी अध्यक्ष मंगेश दोशी,फलटण किराणा -भुसार असोसिएशन चे अध्यक्ष व जैन सोशल ग्रुपचे संचालक अजित दोशी (वाखरीकर)व जैन सोशल ग्रुपचे संचालक डाॅ.मीलिंद दोशी ऊपस्थीत होते.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे कडुन विद्यार्थ्यानां बीस्कीटे व पेन वाटप करण्यात आले. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची कायम स्वरुपी आरोग्य तपासणी व उपचार याकरिता मंगेशभाई दोशी याच्यां वतीने मे. अरीहंत टी.व्ही.एस. च्या वर्धापन दिना नीमीत्त प्रतीवर्षी होणारा औषधोपचार खर्च करण्यात येईल अशी घोषणा मंगेश दोशी यांनी केली.
तसेच वेळोवेळी जैन सोशल ग्रुपच्या वतीने आश्रम शाळेस सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे अध्यक्ष डाॅ.सुर्यकांत दोशी यांनी आश्वासीत केले.
पाच पांडव आश्रम शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष नाना नाळे यांनी सर्वाचा यथोच्चीत सन्मान केला. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ऊपस्थीत होते.
No comments