गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास परवानगी घेणे बंधनकारक
सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारीर स्वरुपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास वरील कायाद्याचे कलम 66 व 67 नुसार फौजदारी करवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी कळविले आहे.
गणेश उत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सन 2022 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. 8 ते 30 ऑगस्ट 2022 अखेर चालू राहणार आहे. ऑनलाईन गणेशोत्सव परवानगीसाठी अर्ज व अर्ज भरण्याच्या माहिती पुस्तिकेची पीडीएफ ही www.charity.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर Application guidlines/प्रणाली मार्गदर्शन या टॅबखाली उपलब्ध आहे. तसेच ऑफ लाईन पध्दतीने भरावयाचा फॉर्म व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी वरील वेब पोर्टलवर मुख्यपृष्ठावर प्राथमिक कार्यपध्दती या टॅबखाली 41-क या शिर्षाखाली पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
No comments