Breaking News

पोलिसांची गंमत करणे पडले महागात ; भाडळी येथील एकावर गुन्हा दाखल


Giving false information to the police is costly; A case has been registered against one from Bhadli

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - भाडळी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा येथील एकाने दारू पिवून, पोलिसांना डायल ११२ वर कॉल करुन, पत्नीला मारल्याची खोटी माहिती कळवली. पोलीस घरी गेल्यानंतर त्याने, पोलीस माझ्या घरी यावेत, म्हणुन मी सहज दोन वेळा फोन करून, तुम्हाला माझे घरापर्यंत येण्यास भाग पाडले असल्याचे कबुल केले. मात्र  पोलिसांची  गंमत  करणे त्याला  महागात पडले असून, फलटण ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

    दिनांक २२/०८/२०२२ रोजी रात्री ९.३० वा. चे सुमारास एम.डी.टी बिट मार्शल क्र.०२ वर कॉल आलेने सदर कॉलचा तपशील पाहीला असता त्यामध्ये कॉलरने पत्नीला मारहाण केली आहे व पोलीस मदत हवी आहे, याप्रमाणे तपशील असल्याने सदर कॉलरचे मोबाईल नंबर ९२८४२६४६९२ वर संपर्क करून सदर ठिकाणी अडचण विचारली असता, सदर कॉलर यांनी सांगीतले कि, मी नंदकुमार शिवाजी पवार रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा येथून बोलत असुन, पत्नीला एक तास ते दिड तास पुर्वी डोक्यात मारले आहे,  बायकोला खुप लागले आहे व मला पण लागले आहे. पोलीस मदत मिळावी. असा कॉल आल्याने, सदर ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील नेमणुकीचे पोलिस हवालदार बबन सावळे, चालक रणपिसे, पोलीस नाईक धराडे व पो. कॉ घोरपडे असे सरकारी वाहनाने सदर घटनास्थळी मौजे भाडळी बुद्रूक ता. फलटण जि. सातारा याठिकाणी जावून कॉलरला नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव नंदकुमार शिवाजी पवार वय ४२ वर्षे रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा मो.नं. ९२८४२६४६९२ असे सांगुन, मीच तुम्हाला ११२ नंबर वर फोन करुन तुम्ही पोलीस माझे घरी यावेत, म्हणुन मी सहज दोन वेळा फोन करून, तुम्हाला माझे घरापर्यंत येण्यास भाग पाडले आहे. सदर वेळी पोलीसांनी त्याचे बायकोस व त्यास भांडणात मार लागला आहे किंवा तुमचे भांडणे झाले आहेत का? याबाबत शहानिशा केली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    म्हणून सदर कॉलर नामे नंदकुमार शिवाजी पवार रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण जि. सातारा याने दारू पिवून डायल ११२ वर कॉल करुन तो देत असलेली माहिती खोटी आहे याची त्याला पुर्ण माहिती असताना देखील त्याने मद्याचे सेवन करुन डायल ११२ वर कल करुन खोटी माहिती दिलेली आहे. म्हणुन त्याचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत गुन्हा रजि. नं. ५९४ /२०२२ भा.द.वि.स. कलम १७७, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रकाश खाडे पो. हवा.ब.नं. १०४० ने. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत. फलटण तालुक्यातील नागरिकांनी अशा प्रकारचे खोटे कॉल डायल ११२ ला करू नये. खोटे कॉल केल्यास आपणास ६ महिने कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा होवु शकते असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.

    सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजित बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस श्री. धन्यकुमार गोडसे यांचे सुचनेप्रमाणे बबन साबळे पो. हवा.ब.नं. ४०१, योगेश रणपिसे पो.ना.ब.नं.८०६, हरिदास धराडे पो.ना.ब.नं. २३२० व पो.कॉ. २१०२ घोरपडे यांनी केली आहे.

No comments