विदेशी दारूची चोरटी विक्री ; मलवडी येथील युवकावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - झडकबाईचीवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत, मटण दुकानापाठीमागे झाडाच्या आडोशाला, बेकायदा बिगर परवाना विदेशी दारूची चोरटी विक्री केल्याप्रकरणी मलवडी ता. फलटण येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास, मौजे झडकबाईचीवाडी ता. फलटण गावचे हद्दीत सलीमचाचा यांच्या मटण दुकाना पाठीमागे झाडाच्या आडोशाला, रोहन प्रकाश कारंडे रा. मलवडी ता. फलटण हा बेकायदा, बिगर परवाना विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून मॅकडोल नंबर १ व्हिस्की असे लेबल असणारे १८० मिली च्या एकूण ३ सीलबंद बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू सुपेरिअर ग्रेन व्हिस्की असे लेबल असलेल्या १८० मिलीच्या ३ सीलबंद बाटल्या, मॅकडॉल नंबर एक सेलेब्रेशन रम असे लेबल असलेल्या १८० मिली च्या दोन सीलबंद काचेच्या बाटल्या असा एकूण १२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, कारंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे करीत आहेत.
No comments