प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई दि. 18 : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गैरप्रकाराबाबत रुबी हॉल क्लिनिक, पुणे वानवडी येथील इनामदार हॉस्पिटल, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि व्यवस्थापन यांची चौकशी करण्यात येईल. दोषी डॉक्टर अथवा व्यवस्थापन यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. ही चौकशी कमीत कमी कालावधीत पूर्ण केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
No comments