लायन्स क्लब फलटणचा पदग्रहण समारंभ मंगळवारी ; अध्यक्षपदी विजयकुमार लोंढे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - लायन्स क्लब फलटण फलटणच्या अध्यक्षपदी विजयकुमार लोंढे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षपदी ला. सविता दोषी तर लिओ क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षपदी कौशल यादव यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक १६/८/२०२२ रोजी सायंकाळी ठिक ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आहे.
शपथविधी व पदग्रहण समारंभास एमजे लायन भोजराज नाईक निंबाळकर, एमजे लायन राजेंद्र शहा, लायन लालासाहेब जाधव, लायन प्रभाकर आंबेकर, एमजे लायन महेश खुस्पे, लायन मिलिंद शहा. लायन सुनिल सुतार, लायन प्रमोद जगताप जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती लायन विजयकुमार लोंढे पाटील यांनी दिली आहे. याप्रसंगी सर्व मित्र मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments