Breaking News

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

Inquiry into deaths due to illegal abortions through special team – Information from Public Health Minister Tanaji Sawant

    मुंबई : बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

    सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

    बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीनुसार तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले.

    याबाबतच्या चर्चेत सदस्य राजेश टोपे, देवयानी फरांदे, आशिष शेलार, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.

No comments