आसू येथे अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग ; पोक्सो अंतर्गत २ जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ : ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी शाळा सुटल्यानंतर, अल्पवयीन मुलीचा, शाळा ते पवारवाडी बसस्टॉप पर्यंत व तेथून आसू ता. फलटण बसस्टॉप पर्यंत, चारचाकी गाडीने पाठलाग करून, आसू येथे हाथ पकडून, सर्वांसमोर लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी पवारवाडी ता. फलटण येथील दोघांच्या विरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास, ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी येथील शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनी व दोन मैत्रीणी बाहेर आल्या, त्यावेळी शाळेच्या बाहेर पवारवाडी गावातील साजिद सलीम मुलानी व धनराज दत्तात्रेय हांडगर हे दोघे पीडित विद्यार्थिनीकडे बघून हसले, तसेच पीडित विद्यार्थिनी आसू गावात जाणारे बस मध्ये बसल्या नंतर इरटिका गाडी नंबर एम एच ११ डी ए ०६७५ मधून पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून, गाडीतील खिडकीतून पीडित विद्यार्थिनीकडे बघून हसत होते, त्यानंतर आसू बस स्टॉप येथे आल्यानंतर बसस्टॉप गाडीतून खाली उतरल्यानंतर १२.४५ वाजण्याच्या सुमारास साजिद सलीम मुलानी व धनराज दत्तात्रय हांडगर हे गाडीतून, पीडित विद्यार्थिनीच्या जवळ आले व त्यातील साजिद मुलानी याने पीडितेचा हात पकडला व तो तिस म्हणाला की, तू मला खूप आवडतेस, आय लव यू असे सर्वांसमोर म्हणून, मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला साजिद सलीम मुलानी व धनराज दत्तात्रय हांडगर दोन्ही राहणार पवारवाडी ता. फलटण विरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.
No comments