'छत्रपती संभाजीनगर, 'धाराशिव’, ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ नावे शासकीय ठरावानुसार दोन्ही सभागृहात मंजूर
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अन्वये शासकीय ठरावात औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ' अशा नावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला 'लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ' असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करण्याचा शासकीय ठराव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विधानपरिषदेत सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.
No comments