एन. सी. सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला मुधोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
प्रवेश प्रक्रियेचे निरीक्षण करताना कर्नल दिपक ठोंगे व मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतीय आर्मी .एअर फोर्स, नेव्ही यामध्ये भरती होण्यासाठीची एक प्राथमिक पायरी समजल्या जाणाऱ्या नॅशनल कॅडेट क्रॉप्स तथा एन.सी.सी. ची प्रथम वर्ष ( सिनियर ग्रुप ) प्रवेश प्रक्रिया मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी, 22 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सातारा यांच्यामार्फत मुधोजी महाविद्यालय , फलटण च्या मैदानावर पार पडली.
यावेळी प्रवेश प्रक्रिये बद्दल माहिती देताना मुधोजी कॉलेजचे एन.सी.सी विभागाचे प्रमुख कॅप्टन प्रा.संतोष धुमाळ यांनी सांगितले की, यशस्वी होऊन निवड झालेल्या कॅडेटने जर 'ए' , 'बी' सर्टिफिकेट मिळविले तर त्यांना भरतीमध्ये पाच , दहा मार्क अधिक भेटतात व जर त्यांनी 'सी' सर्टिफिकेट मिळविले तर त्या कॅडेटला भरती होण्याच्या फिजीक्स , केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, तार्किक विवेचन, सामान्य ज्ञानावर आधारित असणाय्रा लेखी परीक्षेतून सूट दिली जाते व त्यांची भरती मध्ये केवळ शारीरिक व मेडिकलच्या चाचणी द्वारे निवड केली जाते.
आर्मी ची शिस्तबद्ध लाईफची आवड असणाय्रा कॅडेटला आर्मी ची लाईफ कॉलेज मध्येच शिकवली जात असल्यामुळे तसेच बी .एस. एफ, सी .आर. पी .एफ , आय. टी. बी. पी, एस. एस. बी, एन .डी .ए , पोलीस भरती यासारख्या डिफेन्स फोर्सेस भरतीवेळी अतिरिक्त गुण व राखीव जागा असल्यामुळे एन.सी.सी. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचा कॅप्टन धुमाळ यांनी आवर्जून उल्लेख केला.
या प्रवेश प्रक्रियेसाठी 1600 मीटर धावणे , पुषअप्स , पुलप्स, सिटप्स, मुलाखत आणि लेखी परीक्षा घेण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेसाठी 22 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी सातारचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक ठोंगे, कर्नल भालसिंग एन.व्ही , सुभेदार मेजर सतीश तपासे व 22 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चा सर्व स्टाफ तसेच मुधोजी महाविद्यालयातील एन.सी.सी विभाग प्रमुख कॅप्टन प्रा. कॅप्टन संतोष धुमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवेश प्रक्रिया पार पडली.
यावेळेस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय वेदपाठक , 6 गर्ल्स एन.सी.सी बटालियनच्या लेफ्टनंट प्रा. लीना शिंदे यांच्या नियोजनानुसार प्रा. रणधीर मोरे , प्रा .सुनील गोडसे ,प्रा. दिलीप शिंदे , प्रा. मिलिंद शिंदे , प्रा. निवृत्ती करे , प्रा. विकास तरटे , प्रा. रमेश गवळी , प्रा. प्रवीण भोसले , प्रा. शंभूराजे नाईक निंबाळकर तसेच कनिष्ठ विभागातील सर्व स्टाफ यांनी मैदानावर उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
No comments