Breaking News

चोरीच्या उद्देशाने आलेल्याने, वरच्या मजल्यावरून मारली उडी ; १ अटक १ फरार

One who came with intent to steal, jumped from the upper floor; 1 arrested 1 absconding

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : शहरातील मारवाड पेठे येथे चोरी करण्याच्या उद्देशाने २ आले होते. मात्र घरातील व्यक्तिंना चाहुल लागताच, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पळून जाणाऱ्या दोन चोरांपैकी एकाने वरच्या मजल्यावरुन उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर त्याचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. 

         याबाबत युवराज मोहनलाल लोहाणा वय ५९ रा. मारवाडपेठ फलटण यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लोहाना यांच्या मारवाडपेठेतील राहत्या घरात छोटू अब्दूल शेख रा. गजानन चौक, फलटण व तोहसिब उर्फ बबलू पठाण रा. फरांदवाडी ता. फलटण यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बेडरुमची कडी काढून, आत प्रवेश करून, चोरी करण्याचा प्रयत्न करत होते.  मात्र घरातील व्यक्तिंना चाहुल लागताच, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तोहसिब उर्फ बबलू पठाण याने वरच्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सोबत असलेला छोटू अब्दूल शेख हा मात्र पळून गेला. यामधील जखमी बबलू पठाण यास फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढिल तपास  हवालदार ए. ए. गार्डी करीत आहेत.

No comments