फलटण येथे कबुतर स्पर्धा संपन्न ; प्रथम क्रमांक अमित काकडे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - विश्वसत्य कबुतर मित्र मंडळ, फलटण यांच्या वतीने भव्य कबुतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये ५९ तास ४१ मिनिटे कबुतर उडवत अमित काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
सिद्धांत अहिवळे यांनी आयोजित केलेल्या या कबुतर स्पर्धेमध्ये मध्ये एकूण १५ बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस अमित काकडे - ५०,००० रू. (५९ तास ४१ मी.) यांना मिळाला, द्वितीय क्रमांक रोहित जाधव - ३०,००० रू. (५० तास ३४ मी.) यांना मिळाला तर तृतीय क्रमांक सागर आडके २०,००० रू. (४२ तास ४५ मी.) यांना मिळाला व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस बाळासाहेब खरात ५००० रू. (३९ तास ०६ मी.) यांना मिळाला. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून १० ट्रॉफी देण्यात आल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.सिद्धांत अजित अहिवळे (अध्यक्ष), श्री.मोरेश्वर करगे (उपाध्यक्ष), श्री.अमोल काकडे (खजिनदार) यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचा बक्षीस वितरणचा कार्यक्रम लयभारी हॉटेल, फरांडवाडी सातारा रोड येथे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
No comments