साथ रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी ; मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरात डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप असे बहुतांश रुग्ण सापडत आहेत. शहरातील सर्व दवाखाने रुग्णांनी भरलेले आहेत. तरी फलटण नगरपरिषदेणे साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करावी यासाठी मंगळवार दिनांक ३०/०८/२०२२ ठीक ११ वाजता फलटण नगर पालिका मुख्याधिकारी व प्रशासक यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले आहे.
फलटण नगर परिषद हद्दीतील मुख्य गावठाण व शेजारील परिसरामध्ये सध्या साथीच्या रोगाचे डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप असे बहुतांश रुग्ण सापडत असून, फलटण शहरातील सर्व दवाखाने रुग्णांनी गच्च भरले असून, फलटण नगर पलीका या बाबत कोणताही विचार न करता प्रशाषण सुस्त झालेले आहे. तरी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी या बाबत ताबडतोप उपाय योजना करावी यासाठी मंगळवार दिनांक ३०/०८/२०२२ ठीक ११ वाजता फलटण नगर पालिका मुख्याधिकारी व प्रशासक यांना घेराव घालण्यात येईल भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले आहे.
फलटण नगरपरिषदेतील सत्ताधारी मंडळीना याबाबत नागरिकांचे कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे जनता प्रचंड त्रस्त झालेली असून त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी फलटण शहर यांच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात औषध फवारणी, फॉगिंग, स्वच्छता अभियान हाती घेणार आहे. तरी प्रशासनाने याची दाखल घेवून सर्व शहरात साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करावी.
No comments