खासदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले रणजितसिंह एकदम ओके - आ. शहजीबापू पाटील
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांचे स्वागत करताना मेहबूबभाई मेटकरी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माढा लोकसभा निवडणूक जिंकल्यापासूनच शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या लोकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे तसेच शेतकरी, शेतमजूर, युवा वर्गासाठी नेहमीच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणारे तसेच खासदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर एकदम ओके आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील गावागावात विकासासाठी प्रयत्न होणार आहे. केंद्रातून खा. रणजितसिंह व राज्यातून भाजप-शिवसेनेचे सरकार विकासात कोठेही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आ. शहाजीबापू पाटील यांनी केले.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ग्रुप व अहद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे भव्यदिव्य अशी दहीहंडी संपन्न झाली. या दहीहंडीच्या निमित्ताने फलटण शहरासह तालुक्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता होते. दहीहंडीस गुणवरे येथील संघाने सलामी दिली. तसेच गोखळी संघाने रोमहर्षक पद्धतीने दहीहंडी फोडली. यावेळी खा. रणजितसिंह यांची वहीतुला करण्यात आली. त्याचे वाटप शालेय मुलांना करण्यात आले.
गोखळी दहीहंडी संघास परितोषिक देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील |
यावेळी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख, सिनेकलाकार विशाल निकम, सिनेअभिनेत्री अमृता धोंगडे, आयोजक मेहबूब भाई मेटकरी, उद्योजक सागरशेठ शहा, रेल्वे समितीचे सदस्य रियाज इनामदार, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने, राहुलशेठ शहा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. रणजितसिंह यावेळी म्हणाले सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी मेहबूब मेटकरी व त्यांचा मित्रपरिवार अग्रेसर असतो. आजची दहीहंडी दिमाखदार व नियोजनबद्ध आखली असून, असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. फलटण शहर व तालुक्याला महाराष्ट्रात एक आगळेवेगळे स्थान असून, तरूण वर्गासाठी एकत्र येऊन जपलेली ऐक्याची परंपरा कायम राहील, यासाठी मी तुमच्या सोबत असेन.
सात वर्षांहून अधिक काळापासून फलटण शहर व तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन मेहबूब मेटकरी करत असतात. गोरगरीब लोकांना मदत करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, दिवाळी, ईद या सणांना समाजातील गरीब घटकांना मदत ते करण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांसाठी वही, पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात मेहबूब मेटकरी अग्रेसर असतात.
दहीहंडीवेळी जयकुमार शिंदे, डॉ. प्रवीण आगवणे, अशोकराव जाधव, बजरंग गावडे, अमोल सस्ते, पै. स्वागतशेठ काशीद, संतोष गावडे, सचिन अहिवळे, अर्जुन पिसाळ, प्रवीण भोसले उपस्थित होते.
या प्रसंगी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ गणेशोत्सव मंडळ, दगडीचाळ गणेशोत्सव मंडळ, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक चौक गणेशोत्सव मंडळ, नवचैतन्य गणेशोत्सव मंडळ, बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ कसबा पेठ बुरुड गल्ली, अमर ज्योती गणेशोत्सव मंडळ, शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक, नेहरू युवा गणेशोत्सव मंडळ बारसकर गल्ली फलटण या मंडळांना गणेशोत्सव अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
No comments