राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू
सातारा दि. 19 : राज्य सेवा पूर्व परीक्षा-2022 रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सातारा व कराड या तालुक्यातील 22 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू केले आहेत.
परीक्षा होणारे केंद्रे पुढीलप्रमाणे. १) अभयसिंह राजे भोसले, इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, शाहूनगर, शेंद्रे,सातारा २) आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सदरबझार कॅम्प सातारा ३) लालबहादूर शास्त्री कॉलेज, १७ मल्हारपेठ, सातारा, ४) अनंत इंग्लिश स्कूल, मंगळवार पेठ, सातारा, ५) कन्या शाळा, १५५ अ/ब, भवानी पेठ, सातारा, ६) महाराजा सयाजीराव विदयालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा, ७) न्यु इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातारा, ८) यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, राष्ट्रीय महामार्ग क्र.४ जवळ, वाढे फाटा, सातारा, ९) यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सदरबझार, कॅम्प, सातारा भाग-अ, १०) यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सदरबझार, कॅम्प, सातारा भाग-ब, ११) अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पानमळेवाडी, पो.वर्ये, ता.जि.सातारा, १२) कर्मवीर भाऊराव पाटील पॉलटेकनिक, पानमळेवाडी, पो. वर्ये, ता.जि.सातारा, १३) धनंजराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज, सदरबझार, कॅम्प सातारा, १४) कला व वाणिज्य महाविद्यालय, ११७ अ/१.२.३ कोटेश्वर मैदानासमोर, शुक्रवार पेठ सातारा, १५) कर्मवीर भाऊराव पाटील, कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सदरबझार, आरटीओ ऑफिस शेजारी सातारा, ता.जि. सातारा, १६) श्रीपतराव पाटील हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, करंजेपेठ, सातारा, १७) पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व्हे नं. ४३, प्लॉट नं. १व २, पंडीत पार्क, तामजाईनगर नगर, करंजे पेठ, सातारा, १८) भवानी विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, १७ मल्हार पेठ, सातारा, १९) सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, विदयानगर, कराड. ता.कराड, जि.सातारा भाग-अ, २०) सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, विदयानगर, कराड, ता.कराड, जि.सातारा भाग-ब, २१) टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड, ता.कराड, जि.सातारा, २२) छत्रपती शिवाजी कॉलेज, सदरबझार, कॅम्प सातारा.
या परीक्षा केंद्रांवर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी.बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेहण्यास मनाई करण्यात आली आहे.
No comments