Breaking News

विद्यार्थीनीचा विनयभंग ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Student molestation; A case has been registered under POCSO

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ : विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस स्टेशनला बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियमानुसार तुषार सुर्यकांत मुळीक विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.  

    फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी पावनेएकच्या सुमारास डि.एड. चौकातील फळांच्या दुकानाजवळ संबंधित विद्यार्थीनी सायकलवरुन क्लास जात असताना, दोन दिवस तीचा पाठलाग करुन तुषार सुर्यकांत मुळीक रा. फलटण याने वाईट हेतूने विनयभंग केला. सदर प्रकार पिडीत मुलीने क्लासमध्ये गेल्यानंतर शिक्षकांना व आपल्या पालकांना सांगितला. त्यानुसार फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याने मुळीक याच्या विरुध्द भादविसं कलम ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड या करीत आहेत.

No comments