Breaking News

सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - मंत्री शंभूराज देसाई

There will be no shortage of funds for the overall development of Satara district - Minister Shambhuraj Desai

सातारा: जिल्ह्याच्या विकासाचे जी प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत त्याची माहिती द्यावी. तसेच डोंगरी विकास, प्रलंबित पुनर्वसन व पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र असल्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा मंत्री श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मंजूरीचा शासनाने निर्णय घेतला आहे.  त्याची अद्यावत यादी सहकार विभागाने तयार करावी. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. त्या दृष्टीने काम करावे, अशा सूचना करुन श्री. देसाई यांनी  जलसंधाणाची कामे, डोंगर विकास अंतर्गतची कामे,  धरणामधील पाणीसाठा, आरोग्य यासह विविध विषयांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लामन दिव्याचे मंत्री शभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या लामन दिवाचे प्रज्वलन करुन त्याचे लोकार्पण शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments