एसटीच्या चाकाखाली दुचाकी ; एक ठार एक जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ : फलटण सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीच्या पुलावर एसटी बस खाली दुचाकीस्वार आल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. नवनाथ भिवा फरांदे वय ४४ रा.फरांदवाडी ता.फलटण असे मृत पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.
फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, बुधवार दि. २४ रोजी मोटार सायकल नं एमएच ११ बीएफ ८५४४ वरुन नवनाथ भिवा फरांदे हे पुतण्या रूपेश राजेंद्र फरांदे वय १९, रा. फरांदवाडी (गेस्ट हाऊस जवळ) ता. फलटण हे फलटणकडे येत होते. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बाणगंगा नदीच्या पुलावर एक वाहन एसटीला ओव्हरटेक करुन अंगावर आल्याने, फरांदे यांनी जोरात ब्रेक दाबल्याने मोटार सायकल खडीवरुन घसरली. खाली पडल्यानंतर घसरलेले नवनाथ फरांदे हे एसटीच्या पाठीमागील चाकात आल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर रुपेश फरांदे हा जखमी झाला. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम हे करीत आहेत.
No comments