वैभवी यशपाल भोंसले - पाटील १० वी सीबीएससी बोर्ड परीक्षेत ९९ % गुण मिळवून सर्वप्रथम
कु. वैभवी भोंसले - पाटील हिचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी तहसीलदार समीर यादव, भाऊसाहेब कापसे, यशपाल भोसले. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सी.बी.एस.सी. बोर्ड स्कूलची विद्यार्थिनी कु. वैभवी यशपाल भोंसले - पाटील ही इयत्ता १० वी सी.बी.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९९ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तहसिलदार समीर यादव यांनी कु. वैभवीचे पुष्पगुच्छ व पेढे देवून अभिनंदन केले.
कु. वैभवी भोंसले - पाटील हिने इंग्रजीमध्ये ९७, हिंदी कोर्स बी मध्ये ९९, गणितात १००, शास्त्र १०० आणि सोशल सायन्स मध्ये ९९ असे एकूण ४९५ गुण मिळविले आहेत.
फलटणचे लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष स्व. ॲड. स. रा. तथा बापू भोंसले - पाटील यांची पंती, ॲड. विजयसिंह तथा छोटू काका सखाराम भोंसले - पाटील यांची नात आणि यशपाल विजयसिंह भोंसले - पाटील यांची सुकन्या कु. वैभवी भोंसले - पाटील हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सी.बी.एस.सी. बोर्ड स्कूल मधून या परीक्षेस १०५ विद्यार्थी बसले होते, प्रशालेचा निकाल ९४.२८ % लागला आहे.
या विद्यालयातून ९९ % गुण मिळवून कु. वैभवी भोंसले - पाटील विद्यालयात प्रथम, ९७ % गुण मिळवून निखिल विजय शिंदे द्वितीय, ९६.४ % गुण मिळवून श्रवण नेताजी निंबाळकर आणि शंभूराज महेश साळुंखे तृतीय, ९६ % गुण मिळवून क्षितिज रविकिरण राऊत आणि शिवश्री भूपेश जाधव चतुर्थ, ९५.४ % गुण मिळवून कार्तिकी जयदीप भोंसले - पाटील आणि वरद विकास पवार पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी/विद्यार्थिनी यांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्रिंसिपॉल सौ. मिनल दिक्षीत यांनी अभिनंदन केले आहे.
No comments