Breaking News

ग्रामसेवकाकडून महिलेचा विनयभंग ; लाकडी दांडक्याने मारहाण

Woman molested by Gramsevak; Beating with a wooden stick

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - गोळेवाडी ता. फलटण गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलेचा हात धरून, तू मला फार आवडतेस, तू माझी झाली पाहिजे असे म्हणून पीडित महिलेस शिवीगाळ व मारहाण केली व हा प्रकार कोणाला सांगू नकोस असा दम देऊन, खुर्चीच्या तुटलेल्या लाकडाने पीडित महिलेला मारहाण केल्याप्रकरणी ताथवडा गावचे ग्रामसेवक  राजाराम शंकर ढोक यांच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक  २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास, गोळेवाडी ता. फलटण गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक रा. वाठार निंबाळकर ता. फलटण हल्ली राहणार लक्ष्मी नगर, फलटण याने, पीडित महिलेचा हात धरून, तू मला फार आवडतेस, तू माझी झाली पाहिजे असे म्हणून पीडित महिलेस जवळ ओढून, पीडित महिलेस शिवीगाळ करून, हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचवेळी पीडित महिला तिच्या पतीस फोन करीत असताना, राजाराम शंकर ढोक याने पीडित महिलेचा मोबाईल घेऊन जमिनीवर आपटून मोबाईल तोडून त्याचे नुकसान केले आहे व सदर बाबत कोणाला काहीही सांगू नको असे म्हणून, पीडित महिलेस खुर्चीवर जोरात ढकलले व त्यामुळे तेथील खुर्ची तुटून त्या खुर्चीचे तुटलेल्या लाकडाने पीडित महिलेस डोक्यावर, हातावर, मांडीवर मारहाण केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.

No comments