Breaking News

तडीपार केलेले असतानाही फलटणध्ये फिरणाऱ्यावर कारवाई

Action against those who move around the city even while being deported

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - फलटण नगरपालिका हद्दीमधुन दि.३१/८/२०२२ ते ९/९/२०२२ या कालावधीत हद्दपार केलेले असतानाही विजय सदाशिव गिरी हा, जिंती नाका, फलटण येथे आढळून आल्याने, फलटण शहर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाऴी ५ वाजण्याच्या सुमारास  जिंती नाका, फलटण येथे विजय सदाशिव गिरी वय ४५ वर्षे रा. मलठण, फलटण यास उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण क्र. एमएजी/सीआरपीसी /१४४/एस आर -०५/२०२२  दि.३०/०८/२०२२ या आदेशाने फलटण नगरपालिका हद्दीमधुन हद्दपार करण्यात आले होते.  दि.३१/८/२०२२ ते ९/९/२०२२ या कालावधीत हद्दपार केलेले असताना, गिरी याने कोणाचीही परवानगी न घेता आदेशाचा भंग करून हद्दपार क्षेत्रात मिऴून  आल्याने, फलटण शहर पोलिसांकडून विजय गिरी याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास यादव करीत आहेत.

No comments