विनयभंग केसमध्ये जामीन मिळाल्यावर ग्रामसेवकाने पीडित महिलेस दिली धमकी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ - ताथवडा गावचे ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक यांच्या विरोधात विनयभंग व मारहाणीच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांना न्यायालयाने दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला. मात्र ग्रामसेवक ढोक जामीनवर बाहेर येताच, त्याच दिवशी सांयकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी जाऊन, पीडित महिलेस व त्यांच्या पतीस मारहाण केली असल्या प्रकरणी, ग्रामसेवक ढोक यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेले माहितीनुसार, ताथवडा गावचे ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक यांना विनयभंग व मारहाणीच्या गुन्ह्यात दिनांक ३१/०८/२०२२ रोजी फलटण कोर्टात हजर केल्यावर, ढोक यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीचे पती व फिर्यादीस गौरी शंकर अपार्टमेंट शेजारी गोळीबार मैदान, विद्यानगर, फलटण येथे, तुम्ही माझे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला, तो काढून घ्या असे म्हणून धक्काबुक्की करून शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे एन. सी. नंबर ७२८/२०२२ दिनांक ३१/८/२०२२ भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
No comments