मुरुम, ता. फलटण येथे वीज पडल्याने एक एकर ऊस जळून खाक
![]() |
जळालेल्या ऊसासोबत शेतकरी महेंद्र जयवंत बोंद्रे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुरु असतानाच ऊसाचे शेतात पडलेल्या वीजेमुळे सुमारे ४० आर क्षेत्रातील उभा ऊस जळाल्याने मुरुम, ता. फलटण येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री पाऊस, वादळ वारे आणि ढगांच्या गडगडाटासह वीजांचा प्रचंड कडकडाट सुरु होता, त्यावेळी मोठा आवाज झाल्याने कोठे तरी वीज पडली असे सर्वानाच जाणवले. मात्र त्याबाबत लगेच माहिती मिळाली नाही.
होळ तलाठी, महसूल मंडलाधिकारी यांनी आज सदर जळालेल्या ऊस पिकाची पाहणी करुन अहवाल तहसील कार्यालयात पाठविला आहे.
महसूल मंडलाधिकारी विजय गाडे, गाव कामगार तलाठी कुंभार यांनी दिलेल्या अहवालानुसार शकुंतला लक्ष्मण पोळ यांच्या मुरुम, ता. फलटण येथील सर्व्हे नंबर ६२ मधील सुमारे ४० आर म्हणजे एक एकर क्षेत्रातील उभा ऊस वीज पडल्याने जळून गेला आहे.
सदर शेतकऱ्याने वीज पडल्याने म्हणजे नैसर्गिक आपत्ती मध्ये आपले नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
No comments