भावास मारहाण करणार्या भाऊ - भावजय व पुतणीवर गुन्हा दाखल
Beating brother at Malwadi; A case has been registered against brother, sister -in-law and nephew
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ - मलवडी ता. फलटण येथे, तुम्ही दुसरी पाईपलाईन करा, आमची पाईपलाईन वापरू नका असा मेसेज भावाच्या मुलाने केल्यामुळे, चिडून जाऊन दुसऱ्या भावाने व त्याच्या घरातल्यांनी भावास मारहाण केल्याप्रकरणी मलवडी येथील तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
अब्दुल हिराभाई सय्यद वय ५४, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मौजे मलवडी ता. फलटण गावचे हद्दीत फिर्यादी राहते घराचे समोर कोंबड्या विकत घेत असताना, भाऊ रज्जाक हिराभाई सय्यद याने, मला बघून माझ्या जवळ आला व त्याने माझा मुलगा जुबेर याने त्याच्या फोनवर, तुम्ही स्वताची पाईप लाईन करून घ्या, आमची पाईप लाईन वापरू नका, असा मेसेज केल्याच्या कारणावरून चिडून जावून, मला शिवीगाळ केली व रज्जाक सय्यद त्याची पत्नी शमीम व मुलगी काजल यांनी मला मारहाण करून रज्जाक सय्यद याने माझे डाव्या हाताचे मनगटाचेवर पोटरी जवळ चावा घेवून दुखापत केली आहे, तसेच मला व मुलगा जुबेर यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद अब्दुल हिराभाई सय्यद यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
No comments