Breaking News

फलटण शहरात नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम

Cleanliness campaign by Municipal Council in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ -  सध्या पावसाळी दिवस सुरू असलेने साथरोगाच्या प्रार्दुभावावर प्रतिबंधात्मक उपाय योजना नगरपरिषदे मार्फत जून महीन्यापासून राबविणेत येत आहे. सदर प्रतिबंधात्मक उपाय योजना आणखी प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याने, फलटण नगरपरिषद हददीमध्ये शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी फलटण शहरामध्ये स्वच्छता मोहिम राबविनेत येत आहे. सदरच्या मोहिमे अंतर्गत शहरामधील सर्व नगरपरिदषदेच्या खुल्या जागा तसेच खाजगी मालमत्ता धारक यांच्या खुल्या जागेमध्ये वाढलेली झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे. 

    नगर परिषदेने या माहीमे अंतर्गत एकूण १२ प्रभागासाठी १२ प्रभाग सचिव तसेच कर व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर जाबाबदारी सोपविण्यात आलेली आहे सर्व १२ प्रभागासाठी लोकसहभागातून १२ जेसेबी उपलब्ध करणेत आलेले आहेत. सदरची स्वच्छता माहिम ही सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राबविणेत येणार आहे. तसेच सदरची मोहीम आवश्यकते नुसार लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे तरी खाजगी प्लॉट धारकांनी व नागरीकांनी या मोहीमेमध्ये सहभागी होवून स्वताहून आपला सहभाग नोंदवावा व स्वच्छता करून घेण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे. 

No comments