सुलभा तानाजी सस्ते यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या माजी संचालिका, आदर्श व उपक्रमशील शिक्षिका शिष्यवृत्ती, नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शिका, उत्तम निवेदिका सौ.सुलभा तानाजी सस्ते, मुख्याध्यापिका जि.प.शाळा नाईकबोमवाडी यांना सन २०२२-२३ चा सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे मा. सभापती नाम. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सर्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,सर्व पंचायत समिती सदस्य, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, फलटण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ.शाहीन पठाण, श्री.चन्नया घाळय्या मठपती सो. शिक्षण विस्तार अधिकारी बीट- बरड, गिरवी, अनिल संकपाळ तरडगाव बीट,केंद्रप्रमुख पांडुरंग धुमाळ,राजकुमार रणवरे, दारासिंग निकाळजे, बन्याबा पारसे, फलटण तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष भगवंतराव कदम, फलटण तालुका आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) चे तालुका अध्यक्ष जयवंत तांबे सर, शिक्षक बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन सोमनाथ लोखंडे सर,सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जेष्ठ नेते श्री तानाजी सस्ते सर, फलटण तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, नाईकबोंमवाडीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रापंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी सौ.सुलभा तानाजी सस्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments