Breaking News

ग्रामसेवक विनयभंग केस ; पुरवणी जबाबामुळे कलमात वाढ

Gramsevak molestation case; Increase in clause due to supplementary response

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ सप्टेंबर - ताथवडा गावचे ग्रामसेवक  राजाराम शंकर ढोक यांच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिलेने पुरवणी जबाब देऊन गुन्ह्याबाबत आणखी माहिती दिल्यामुळे आरोपीताच्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

    गोळेवाडी ता. फलटण गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहकारी ग्रामसेवक महिलेचा हात धरून, तू मला फार आवडतेस, तू माझी झाली पाहिजे असे म्हणून पीडित महिलेस शिवीगाळ व मारहाण केली. पीडित महिला तिच्या पतीस फोन करीत असताना, राजाराम शंकर ढोक याने पीडित महिलेचा मोबाईल घेऊन जमिनीवर आपटून मोबाईल तोडून त्याचे नुकसान केले व सदर बाबत कोणाला काहीही सांगू नको असे म्हणून, पीडित महिलेस खुर्चीवर जोरात ढकलले व त्यामुळे तेथील खुर्ची तुटून त्या खुर्चीचे तुटलेल्या पायाच्या साह्याने पीडित महिलेस डोक्यावर, हातावर, मांडीवर मारहाण केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली होती.

    सदर गुन्हयातील फिर्यादी महिलेने पुरवणी जबाब दिला असून त्यामध्ये त्यांनी आरोपीने पीडित महिलेस ओढून तिचा ब्लाऊज ओढला होता. त्यामध्ये तो फाटला असल्याचे सांगितले असल्याने सदर गुन्हयांस भा.दं.वि. कलम ३५४(ब) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.

No comments