Breaking News

अ. भा. मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांना स्मृति दिनानिमित्त फलटण येथे अभिवादन

कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेसमवेत सर्व पत्रकार व निंबाळकर कुटुंबीय.
Greetings to Haribhau Nimbalkar on the occasion of Memorial Day at Phaltan

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४  : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या २२ व्या स्मृति दिनानिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांचेवतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

       शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी येथील पत्रकार भवनात फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांचेवतीने आयोजित कार्यक्रमात स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, मराठी पत्रकार परिषद तालुकाध्यक्ष प्रा. रमेश आढाव, शिवसंदेशकर कॉ. हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन, ग्रंथालय, वाचनालयाचे अध्यक्ष सुभाषराव भांबुरे, लायन्स माळजाई उद्यान प्रकल्पाचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर, माजी नगरसेवक अजय माळवे व हेमंत निंबाळकर, ग्रामीण पत्रकार संघाचे  पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष युवराज पवार, शक्ती भोसले,  सुर्यकांत निंबाळकर, राजकुमार गोफणे, सतिश कर्वे, आनंदा पवार, अजय निगडे, सुरज पवार, सुभाषराव सोनवलकर, सचिन मोरे, लखन नाळे, विठ्ठल शिंदे, शितल लंगडे, पोपट मिंड, प्रकाश सस्ते, राजेंद्र भागवत, सई निंबाळकर व श्‍वेता निंबाळकर यांची उपस्थिती होती.

      प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

No comments