Breaking News

फलटण शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस

फलटण - पाण्याखाली गेलेला दत्तघाटाकडे जाणारा रस्ता
Heavy rain in Phaltan city and taluka

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून संतत धार पाऊस सुरु आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाने शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीसह तालुक्यातील अनेक ओढ्यां नाल्यांना प्रचंड पूर आले आहेत. अनेक ठिकाणी ओढ्यावरील पुलांचे व रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

बाणगंगा नदी पात्रात मधोमध असलेल्या मंदिरास पुराच्या पाण्याने दिलेला वेढा

      फलटण शहरात फलटण पुणे मार्गावर खडकहिर्‍याच्या ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहिल्याने या ठिकाणी वाहतूक काही काळ ठप्प होती. या ओढ्यालगत असलेल्या दुकानांनाही या पुराच्या पाण्याचा फटका बसला. फलटण शहरात अनेक ठिकाणी गटारे तुडूंब भरल्याने व तुंबल्याने पाणी रस्त्यावरुन वाहिल्याने त्याचा फटका येजा करणार्यांना बसला. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघातही घडले. बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. एकसारखा पाउस रात्री उशीरापर्यंत पडत राहील्याने शहरात काही ठिकाणी घरात पाणी घुसण्याच्या घटनाही घडल्या. बाणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात आलेले पाणी पाहण्यासाठी ठिकठिकाणी आनेकांनी गर्दी केली व फोटोसेशनही केले. 

शनीनगर परिसरातील घरांना लागलेले बाणगंगा नदीचे पाणी

    कृषी खत्याकडील नोंदी नुसार आज गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात तालुक्यातील महसूल मंडळ निहाय झालेला पाऊस खालीलप्रमाणे आहे.

फलटण ६४.८ मि. मी., आसू २८.८ मि. मी., होळ ३९.५ मि. मी., गिरवी ५७ मि. मी., आद्रकी ७०.५ मि. मी., वाठार निंबाळकर ६४.८ मि. मी., बरड २९.५ मि. मी., राजाळे ४५ मि. मी., तरडगाव ४३.६ मि. मी.

       नीरा उजवा कालवा विभाग कालव्या लगतच्या पर्जन्य मापकानुसार वीर धरण ५५ मि. मी., 

फलटण ८३ मि. मी., निंबळक ६२ मि. मी., धर्मपुरी २० मि. मी. नातेपुते         ०९ मि. मी., माळशिरस १० मि. मी., वेळापूर ०० मि. मी., अकलूज ०९ मि. मी., महाळूंग १८ मि. मी. भाळवणी १२  मि. मी.

No comments