नेव्ही मध्ये नोकरीस असल्याचे सांगून केले लग्न ; पतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ : इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस असल्याचे खोटे सांगून व नेव्हीचे बनावट आयडी व पे स्लिप दाखवून लग्न केल्याची तक्रार पत्नीने आपल्या पतीविरुध्द केल्याने त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला आहे. आकाश काशिनाथ डांगे रा. भाडळी बु. ता. फलटण असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत ऋषिका आकाश डांगे वय २१ मूळ रा. भाडळी बुद्रुक ता.फलटण, हल्ली रा. वाजेगाव ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ एप्रिल २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत ऋषिका यांच्या वाजेगाव ता. फलटण येथील माहेरच्या घरी येवून आकाश डांगे याने त्यांना तो इंडियन नेव्हीत नोकरीस असल्याचे सांगितले. त्याचा नेव्हीच्या वेशातील बनावट फोटो, आयडी कार्ड व पगाराची स्लीप दाखवून आपण नेव्ही मध्ये निलोकरिस असल्याचे भासवले. त्यामुळे ऋषिका यांच्या आईवडीलांनी त्यांचा विवाह आकाश डांगे याच्याशी करुन दिला. लग्नानंतर आकाश हा इंडियन नेव्हीमध्ये कामाला नसुन त्याने बनावट कागदपत्रे दाखवून ऋषिका यांचेशी लग्न करुन त्यांची फसवूक केल्याचे लक्षात आल्याने व तो कधीही नेव्ही मध्ये कामाला नसल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पती आकाश याच्याविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार आकाश डांगे याच्यावर फसवणूकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करीत आहेत.
No comments