Breaking News

दि.27 व 28 सप्टेंबर रेाजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

On 27th and 29th September 2022 Reaji Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair is organized

     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यावतीने दि.27 व 28 सप्टेंबर 2022 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आली असल्याची  माहिती  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

    या मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 170 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने किंवा कंपनीमध्ये प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

  या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.  जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

No comments