फलटणच्या गिरवी नाका चौकाला भारतरत्न राजीव गांधी नाव द्यावे ; फलटण तालुका काँग्रेसची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - देशाचे माजी पंतप्रधान, माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते, भारतरत्न राजीव गांधी यांचे नाव फलटण शहरातील गिरवी नाका या चौकाला देण्यात यावे अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य कदम, युवकचे शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे उपस्थित होते.
No comments