खा. रणजितसिंह व आ. जयकुमार यांचा फलटण तालुक्यात गणनिहाय गावांचा दौरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि १५ : फलटण तालुक्यातील नागरीकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न जाणुन घेवून त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे पंचायत समिती गणनिहाय गावांचा दौरा करणार आहेत तसेच रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी फलटण येथे जाहिर सभेचेही आयोजण करण्यात आले आहे.
अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या अनुषंगाने हा संपर्क दोरा महत्वपुर्ण मानला जात आहे. तसेच आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यातील वाकयुध्द व परस्पर आरोपांच्या झडत असलेल्या फैरी सर्वश्रुत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार व आमदार काय बोलणार याची उत्सुक्ता अनेकांना लागुन राहिली आहे. शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये या दौर्याचे नियोजण करण्यात आले आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करणे, बुथ अभियान राबवणे, बुथ सशक्तिकरण अभियान करणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात का ? याची पाहणी करणे, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, प्रश्न समजून घेणे व ते सोडविण्याच्या दृष्टिने पावले उचलने हा या दौर्यामागचा प्रमुख उद्देश आहे. या दौर्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यासह भाजपच्या जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकार्यांचाही सहभाग असणार आहे. रविवार दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फलटण शहरातील गजानन चौक येथे जाहिर सभा होणार आहे. आयोजित केलेल्या दौर्याचे नियोजण पुढिल प्रमाणे शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता दुधेबावी, दहाला राजुरी, कुरवली पाटी, ११ वा. गुणवरे, दुपारी १२.३० वा पवारवाडी, अडीच वाजता राजाळे, चारला विडणी, साडेपाचला कांबळेश्वर, संध्याकाळी सात वाजता साखरवाडी, साडेआठला तडवळे, साडेनऊला तरडगाव, रविवार दिनांक १८ रोजी सकाळी ८.३०वा. निरगुडी, दुपारी १२ वा. बिबी, २ वा. सासवड व संध्याकाळी पाच वाजता फलटण येथे जाहीर सभा. तरी यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व फदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी केले आहे.
No comments