Breaking News

दुधेबावी परिसरातील विविध प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने करणार - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

 भवानी माता मंदिर परिसराची पाहणी करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर. (छाया : सुभाष सोनवलकर)

Resolving various issues in Dudhebavi area will be prioritized - Shrimant Sanjivraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - भवानी माता घाट रस्त्याची दुरुस्ती, घाटासाठी संरक्षक भिंत, या भागात मोठ्या प्रमाणावर झालेले वृक्षारोपणाची संरक्षण व्यवस्था आणि नव्याने वृक्षारोपण आदी कामे या भागाला असलेल्या 'क' वर्ग तीर्थक्षेत्र निधी आणि नरेगा योजनेतून करावीत या प्रमुख मागण्यांसह गिरवी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळावे या प्रमुख मागणी सह अन्य कामे उपस्थितांनी सुचविली आणि ती पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली.

       सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत दुधेबावी, गिरवी, निरगुडी, सोनवडी, तिरकवाडी व परिसरातील प्रमुख आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी वरीलप्रमाणे मागण्या केल्या. त्यापूर्वी श्रीमंत संजीवराजे यांनी संपूर्ण घाट रस्ता, घाटाची संरक्षक भिंत, भवानी माता मंदिर परिसर व घाटातील वृक्षारोपणाची पाहणी केली. सर्व अडचणी व ग्रामस्थांच्या मागण्या समजावून घेत त्याची पूर्तता करण्याची ग्वाही दिली, 

      यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, माजी सरपंच बाबुराव नाळे, तिरकवाडीचे शिरीष सोनवलकर, सचिन सोनवलकर,  लक्ष्मण सोनवलकर, भाडळी  सोसायटी चेरअमन कुमार सोनवलकर, दुधेबावी सोसायटी चेरअमन श्रीमंत नाळे व सदस्य, निरगुडीचे गणपत सोपान सस्ते, अवचित सस्ते, दिपक सर्जेराव सस्ते, चंद्रकांत सर्जेराव सस्ते, राजेंद्र मधुकर सस्ते, महेश वसंतराव सस्ते, अमोल दशरथ सस्ते, संकेत गणपत सस्ते, गिरवीचे श्रीराम कारखाना संचलक शिवराज कदम, उदयसिंह कदम, रामभाऊ कदम, नारायण कदम, रणजित कदम, धुमाळवाडीचे मारुती फडतरे, पी. व्ही. सर, आणि या परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

     यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवरांचे हस्ते भवानी माता मंदिर परिसरात नारळ वृक्ष रोपण करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुधेबावी विद्यमान उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी तर समारोप व आभार प्रदर्शन संजय सोनवलकर यांनी केले.

No comments