समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर
सातारा दि. 26 : अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या अनु. जातीच्या मुला मुलींना निर्वाह भत्ता इ. योजना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता महाडीबीटी पोर्टलवरुन नवीन व नुतनीकरण अर्जांची ऑनलाईन स्विकृती सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे शिष्यवृत्तीची अदागायी होण्यासाठी खालील वेळपत्रकानुसार ऑनलाईन सादर करावे.
कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (उदा. 11 वी, 12 वी सर्व शाखा, MCVC, ITI इ.) नवीन अर्ज दि. 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत नुतनीकरण अर्ज दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम (उदा. कला, वाणिज्य, विज्ञान, इ. ) नवीन अर्ज दि. 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत नतुनिकरण अर्ज दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत. वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, नर्सिंग इ. ) नवीन अर्ज दि. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत नुतनिकरण अर्ज दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत.
वरील वेळापत्रकानुसार महाविद्यालयामध्येच स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य ती मदत करण्यात यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.
No comments